...

6 views

*बाबा हा कोण असतो ???*



जो झोपेला असून ही अर्धवट झोपेतुन उठून मुलांची औषध आणायला जातो... तो बाबा असतो.

स्वतःची आवड बाजूला ठेवून मुलांची आवड हसत हसत मान्य करतो...तो बाबा असतो.

स्वतःचं दुःख सहज बाजूला ठेवून मुलांसाठी रात्रंदिवस मेहनत करतो.. तो बाबा असतो.

स्वतः जुन्या गोष्टी वापरतो पण मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना पुरवणारा... तो बाबा असतो.

आपल्‍या माणसांचे अश्रू पुसणारा आणि स्वतःचे अश्रू लपवणारा आणि जेव्‍हा कोणी विचारलं काय झाल ? अभाळाएवढं संकट असलं तरी काही नाही बोलणारा...तो बाबा असतो

मुलांनी सांगितलेली प्रतेक चांगली-वाईट गोष्ट शांतपणे ऐकून घेणारा... तो बाबा असतो

मुलांनी केलेल्या चुकांना ओरडून मारुन नाही तर प्रेमाने समजवून सांगणारा.. तो बाबा असतो.

दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारा...तो बाबा असतो.

कितीही दुःख असलं तरीही ते चेहऱ्यावर कधी नाही दाखवत ...तो
बाबा असतो.

स्वतःच्या मुलीला अगदी फुलासारखा जपणारा आणि तिच्‍या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावं म्हणून तिची प्रत्‍येक गोष्‍ट पुरवणारा.. तो बाबा असतो.

स्वतः साठी प्रत्येक सणाला काही नवीन न घेता त्याच्या कुटुंब साठी न विसरता सगळं आणणारा...तो बाबा असतो.

एक दिवस आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार हे महिती असून सुद्धा ते कधी तिला दिसू नये म्हणून सतत प्रार्थना करणारा ...तो बाबा असतो.

मुलां सोबत बाबा नाही तर त्यांचा मित्र म्हणून वागणारा... तो बाबा असतो

आयुष्यात काही चांगला वाईट झालं तर "बाबा" फक्त एक हक लंब आहे अशी खात्री मुलांना पटवून देणारा...तो म्हणजे बाबा असतो..तो म्हणजे बाबा असतो..!!

© __Happyreading__