...

18 views

मी आहेच जरा असा..
मी आहेच जरा असा.. निःशब्द राहणारा..
तुझं नाव ऐकलं की तुझ्यात रमणारा..

बोलक्या चेहऱ्यांमध्ये एकटा फिरणारा..
न बोलताच माझ्यातल्या तुला मांडणारा..

कधी किनाऱ्यावर संथपणे भरकटणार..
तुझ्याइतकच त्या लाटांवर प्रेम करणारा..

कवडस्यासारख फक्त तुझ्यावर पडणारा..
त्या सावल्यांमध्ये नकळत तुला शोधणारा..

मी आहेच जरा असा.. तुझ्यात सामावणारा..
तुझी वाट पाहत स्वतः चातक होणारा..

#ekathangmann ©सागर_एक अथांग मन #कविता #प्रेम #marathikavita #marathiprem #marathistatus #prem #fakt_tu #instawriters #yourquotewriters