कविता तिच्यासाठी खास
तिच्यासाठी लिहावे मस्त झकास
असं नेहमी वाटत राहते मनास
जेव्हा लिहिण्यास घेतो काही खास
मन स्तब्ध होते...थांबतो श्वास
तिच्या सौंदर्यापुढे शब्द ही होतात हताश
हताश शब्दांची तीच काढते समजूत
तिच्या संगतीत शब्द गोड हसतात
शब्दही मग कवितेला सोबत करतात
नकळत उमटत जातं काही कागदात
...