...

1 views

आज लिहू नकोस...
आज लिहू नकोस...
अचल विचल होऊ नकोस...

सोडून दे व्यर्थ मनातले गुंतवणे,
अजून बाकी आहेत तुझीच परीक्षणें.....

आज काही लिहू नकोस,
लेखणी एकदा बाजूला ठेव

नको सांगूस मला कसलीच कारणे,
थांबव तुझे व्याकरण सावरणे...

बघ जगाच्या पलीकडे,
हो ना तू अफाट कोण तुला नडे....

पर्वताच्या पायथ्याशी असलेलं ही जग बघ,
होशील जेव्हा प्रगल्भ शिखर मग बघ....

नदी ओलांडताना आधी त्याचे काठ बघ....
ओलांडल्या नंतर तू त्या पाण्याचा साठ बघ...

सागराच्या ही त्या अशांत लाटा झेल
तुझं जीवन तू निर्भिडपणे पेल....

जंगलात शिरण्या आधी घे अंदाज त्या वातावरणाचा..
उगंच भिऊन प्रयत्न करु नकोस खटपटण्याचा...

आज काही लिहू नकोस,
जगाचा मार एकदा गरका,
खुला आहे अजून ही मनाचा झरोका....

आभाळाला थोडंसं अजुन उत्तुंग बनव,
आज कविता तुझी भावनेने गिरव....

जगाला दाखव थोडी गफलत,
वेळ आहे दे तुझ्या अंतरास सवलत...

सागराच्या तळाशी जाण्याची तयारी तुझी राहू दे,
डोळ्यांना तुझ्या काठावरंच बसून आज प्रभाकराला पाहू दे ...

भरुन टाक तुझ्या अचल हृदयाची उणी,
आज थोडेसे थांब बाजूला ठेव लेखणी....

लिहून लिहून किती तू लिहीणार,
अरे कोऱ्या कागदाला अजून किती सजवणार...

अफाट भावना किती पानांवर उमटवणार...
थांब लिहू नकोस
तू तरी किती धडपडणार....

#Day5 of "रोज एक कविता"
©Vanshika Chaubey
© All Rights Reserved