...

8 views

गज़ल ❤
पहावे तुला एवढे-एवढे कि तो पतंग ही झुरावा ,
वाटते की तूझ्या लाल ओठातला मकरंद प्यावा ।

होउनी मी धड-धड तुझ्या स्पंदनांची जणू ,
वाटते की तुझ्या तप्त उरातला श्वास घ्यावा ।

मोजावे मी क्षण-क्षण विरहाचे अपूल्या उन्मुक्त ,
वाटते की तुझ्या मिठीतला मी आवेग व्हावा ।

माळावे मी तुझे अंग-अंग पंक्तीत कवितेच्या ,
वाटते की तुला गुणगुणाया तूझा कंठ व्हावा ।

✒कवी,
विजय दागमवार