...

3 views

माणसानं
माणसानं केलाय शिरकाव जंगलात,
अनं थाटवू पहातोय घरकूल अंतराळात..
माणसानं केलाय अतिरेक विज्ञानाचा,
डोंगर फोडून करतो उपद्व्याप कृत्रिम पावसाचा...

माणसाचं माणुसपणही बेरकी,
होतं त्याचं मन सणासुदीला दु:खी..
वड, आपट्याची नासधूस पाहून नक्की,
पण डोंगरमाथ्यावर मात्र घरं हवीत पक्की...

माणसानं केलाय नाटकीपणाचा कहर,
गावापेक्षा त्याला वाटतं बरं शहर..
पावसाळ्यात त्याला झाडांची वाटते भीती,
मग सर्वत्र.. झाडांच्या कत्तली चालूच रहाती...

माणसानं आणलाय नाटकीपणाचा आव,
आलं करोना संकट.. आता प्राणवायूसाठी धाव..
माणसानं बांधली धर्म प्रचारा, प्रसारासाठी प्रार्थनास्थळं,
त्या देवाचं स्थान असताना.. सर्वत्र, अढळं, सकळं...

---
© Prasad Thale
#digital
#poetry
#poem
#marathi
#marathikavita
#marathipoems
#marathibana
#inspirational
#writco
#writcoapp