...

2 views

स्वप्नपरी
अशीच आहे माझी स्वप्नपरी
स्वतःच्याच आयुष्यात रंग भरणारी
स्वतःवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी

स्वतःला स्वतःमध्ये शोधणारी
स्वतःच्याच धुंदीत रमणारी
माझ्यावरही जीवापाड प्रेम करणारी
मला सुखदुःखातून सावरणारी

असते ती नेहमी स्वतःच्याच स्वप्नात
आवडत राहायला तिला तिच्या गोड बालपणात
वरून वरून असली शांत तरीही
नेहमी मनात राही खळबळ तिच्या

प्रेमळ आहे ती खूप
जणू श्रावणातली सरी
अशीच तर आहे माझी स्वप्नपरी