...

1 views

माझ्या वाटा
प्रत्येक वाट ही यशाची नसते काही वाटा ह्या स्वप्नांच्या असतात
प्रत्येक वाट ही सिद्ध करायची नसते काही वाटा ह्या स्वप्नांच्या असतात

मला सिद्ध करायचे नाही कारण मी मीच आहे
माझी वाट ही यशाची नाही कारण यश वाट्याला असून माणूस सुखी असतोच का
यशाची वाट ही एकच असते पण स्वप्नांच्या वाट दाहीदिशा असतात

मान्य आहे यशाच्या वाटेवर लढखळायला होते पण स्वप्नांच्या वाटेवर मनात भीती चा काटा असतो
यशाची वाट ही समुद्राची लाट आहे पण स्वप्नांची वाट ही नवी पहाट आहे

यशाच्या वाटेवर मला चालायचे नाही कारण तो तेजस्वी सूर्य होऊन येईल आणि मावळेल

मला स्वप्नांच्या वाटेवर चालायचे आहे कारण मंद आकाशातील चंद्र जसा स्वच्छ पाण्यात दिसेल आणि आयुष्य भर त्यांचे प्रतिबिंब माझ्या डोळ्यात दरवळेल

कवयित्री पल्लवीराणी