...

6 views

विठुमाऊली
काळाने असेलही अडवीले तया पंढरीचे द्वार,
नं लोटला दर्शनास जनसागर अपार..
हिरमुसले भक्तजन, परतले पायी करीत विचार,
करीता गजर विठुनामाचा तयांचे पवित्र जाहले घरदार...

तुच दृढ करीसी तया भक्तांचे मन:विचार,
टाळ चिपळ्यांच्या साथीनं करता तुज नामाचा गजर,
मनाचीये द्वारी राहसी सदा विटेवरी,
पंढरीची वारी नं चुके.. करसी भक्ती मनोरथ साकार...

रोगाने घातले जरी जगभर थैमान..
घरची ती विठुमाऊली करी काळजी अपरंपार..
टेकवूनी तिजचरणी डोकं अनं करुनी नमस्कार,
त्यांची सेवा करता.. होईल हा भवसागर पार...

© Prasad Thale