...

3 views

मैत्री 🫂
जन्मो जन्मी साथ देणारी ,
मदतीचा हात देणारी ,
संकटना सोबत मात देणारी ,
आशी तुझी माझी मैत्री .✨

दुःखाची लाट होती ,
अंधाराची रात होती ,
माझी सावलीही पळून
जात होती ,
तेव्हा तुझी साथ होती .✨

रुसवा असतो क्षणिक
पण हसवा असतो कायम
न वाटणारे क्षण ,
अमूल्य होऊन जातात
अशी तुझी माझी मैत्री .✨

काळोखाची आहे वाट ,
हातामध्ये तुझ्याहात
धडपडत्या आयुष्यात
आता फक्त हवी तुझीच साथ .✨.

रक्ताची नाती जन्माने मिळतात ,
मानलेली नाती मनाने जुळतात ,
पण नात नसतानाही
एका रेशमी बंधाप्रमाने जुळती
ती म्हणजे तुझी माझी मैत्री ✨


इंन्सटा ला स्टोरी अन व्हॉट्स ऍप
ला स्टेटस, ठेवण्यापूरत नाही आपली
मैत्री ,एकमेकांच स्टेटस माहीत असूनही ,
कायम साथ देणारी,
ती म्हणजेच तुझी माझी मैत्री.✨

आपल्या यशात न जळणारा,
आपले उने ,दूने न काढणारा ,
आपले गुपित कायम गुपितच ठेवणारा ,
आपल्याला फुलासारखा जपणारा ,
तो म्हणजे आपला मित्र ..✨

सवय लागून जाते ,
मैत्रीत पूर्णविराम येतो ,
मेसेज बंद होतात ,
कॉल ही बंद होतात ,
पण मित्र म्हटल की फक्त तुझीच आठवण येते ..
अशी तुझी माझी मैत्री ✨

राजनंदिनी लोमटे
ssmb