...

1 views

सुवर्णा क्षण
*सुवर्णक्षण*
__________________________

*सुवर्णक्षण*
इतिहासाचे
आम्हा सदैव
अभिमानाचे

स्वप्नपूर्तता
धरतीवर
जगभरात
अजरामर

मनी जागला
देशाभिमान
चंद्रयानाने
वाढली शान

राष्ट्रउद्धारी
भारतीयत्व
सार्थक झाले
नागरिकत्व

यशस्वीतेची
उंच भरारी
करी सन्मान
दुनिया सारी

अभुतपूर्व
कामगिरीची
अवघ्या विश्वा
नवलाईची

थोर शास्त्रज्ञ
दृढध्येयाशी
माझा तिरंगा
उंच आकाशी

*सौ स्वाती कोरगावकर कोल्हापूर*
© All Rights Reserved