...

1 views

नविनंच घडत होतं...
जीवनाच्या क्षितिजाकडे पाहत भावनांच्या लाटा झेलत,
मन‌ माझं सतत‌ अनेक प्रश्न होतं करत...
सांगण्यासारखं काहीच नव्हतं...
सर्व नविनंच घडत होतं....

हसत खिदळत जेव्हा जीवन असतं,
तेव्हा अनुभवाचं पुस्तक कोरंच दिसतं,
वेदनेला ही वेदना होते,
मनाला खचवून‌ जाणारं काहीतरी होतं,
समजण्यासारखं काहीच नव्हतं...
सर्व नविनंच घडत होतं....


विचार न‌ करता मनसोक्त जगता येत होतं,
जीवन माझं वेगळंच वळण घेत होतं,
विचारांच्या अर्णवात खोलवर गेले,
मनाच्या खोप्यात जणू‌ काहूर माजले,
जिंकणे शक्य असून मी हारले,
माझं हृदय कानोसा घेत होतं...
पण ऐकण्वयासारखं काही नव्हतं...
सर्व नविनंच घडत होतं...

सर्व नविनंच घडत होतं म्हणता म्हणता
होत होत्या हृदयातील भावना फोल..
मेंदू निकामी होत होतं विचार करून सखोल..
एकटेपणाची जाणीव होईपर्यंत आनंदाची उमललेली फुले ही सुकली,
तेव्हा कळलं माझी मी वाट चुकली...


मनातलं एकेक कोपरं ओसाड पडत होतं,
माझं अस्तित्व जणू मला नडत होतं....
समजण्यासारखं काहीच नव्हतं,
सर्व नविनंच घडत होतं.....
©Vanshika Chaubey
© All Rights Reserved
#Day 3