...

14 views

गुरू
गुरुविण ज्ञान । मिळवू पाहती ।
होय अधोगती । तयांची ।।1।।
गुरुविण खूण । जाणली देवाची ।
ऐसे म्हणे त्यांची । मंद बुद्धी ।।2।।
गुरुविण बोध । जाहला म्हणती ।
तोच पूर्णमूर्ती । पांखंडाची ।।3।।
गुरुविण शक्ती । आणि भक्तीप्राप्ती ।
तयांची ती उक्ती । वांझ वांझ ।।4।।
नको नको ऐसा । मनी भ्रष्टाचार ।
रहावे गा दूर । त्यापासोनी ।।5।।
कृष्णदास सांगे । तुम्हा वारंवारू ।
नका हो अंतरू । सद्गुरुराया ।।6।।


© All Rights Reserved