...

12 views

तुला जपणार आहे
होईल मज त्रागा
तुला जपणार आहे
तुझ्या सुखासाठी मी
हवं ते करणार आहे
दुःख जरी जगण्यात हजार
साथ तुझी कधी ना सोडणार मी
सावली बनून तुझी
संकटाशी मी लढणार आहे
डाव आहे प्रीतीचा
ना अर्ध्यावरती मोडणार मी
नाजूक बंध हा नात्याचा
कधी च तोडणार नाही मी
तुझ्या प्रेमासाठी जग ही
त्यागणार आहे मी
जन्मोजन्मी त्या विध्यात्याला
प्रेमात तुलाच मागणार आहे मी

✍️अनामिका
© All Rights Reserved