...

11 views

सदैव तुझ्या जवळी....

मी पाहतो तुला अजूनही
माझ्या अंधारात
मी चालतो तुझं संगें अजूनही
माझ्या स्तब्धतेत
मी बोलतो तुझ्याशी अजूनही
माझ्या शांततेत
मी ऐकतो तुला अजूनही
माझ्या सुन्नतेत
मी आहे तुझ्यासंगे अजूनही
माझ्या शून्यतेत

जेंव्हा नसेन मी या जगी
वाचशील या ओळी
सापडेन मी तुला
सदैव तुझ्या जवळी
© ✍️ प्रस्तुत