...

6 views

पाऊस विरहातला
मन होई वेडेपिसे
येता पावसाची सर
कधी येशील गं सखे
मन झाले गं अधीर

ऐक हाक या मनाची
ये ना धावत साजणी
तुजवीन मुखी येती
आता विरह तराणी

गीत आळवी कोकीळ
वनी नाचतो मयुर
प्रेम गीत गात गात
बघ वाहतो निर्झर

प्रेम उत्सवात प्रिये
मी गं राहिलो निराळा
त्यात जीव जाळायाला
बघ पाऊस हा आला ...!
© शिव पंडित
#longdistancerelationship