...

5 views

आयुष्याची जाणीव
लहानपणी तर कोणालाच नसतं माहिती,
की आपलं भविष्य कसं घडणार...?
अन् कशाप्रकारे परिस्थितीशी भिडल्यास,
आपली मजल कुठे पोहचणार...

अंथरुणातल्या गाड झोपेपासून ते
शाळेतील सहवासात आपण
सप्तरंगी स्वप्नाच्या दुनियेत रंगून जातो,
पण मोठे होऊन जराशी अक्कल
आल्यावर त्या सप्तरंगी स्वप्नामधील
कष्टाचा प्रयत्न वास्तव्यास येणारा सुरुवात होतो...

वाढत्या वयाबरोबर जाणीवही वाढायला लागतात
मग आई-बाबांचे ओझे कमी
करण्यास आपलाही खांदे पुढे सरसावतात...

नकळत ते ओझे जणू आपल्या
खांद्यानाच स्वतःचे घर समजू लागते
मग तेव्हाच खऱ्या अर्थाने आयुष्य
म्हणजे काय याची जाणीव होते...