...

4 views

मित्र
कधी कोड्यात तर कधी गोडीत बोलणारा... समजावून घेणारा तर कधी समजावून सांगणारा... आपलसं करणारा तर कधी हक्काने ओरडणारा,...
हृदयात बसणारा तर कधी गालातल्या गालात हसणारा...
योग्य आहे ही वाट असं सांगणारा...
तर भरभरून कौतुक करणारा...
संकटात हात देणारा...
तर कधी मन दुःखी झाले ...मी आहे ना..
नको काळजी करू...असे म्हणणारा...
ओठांवर हसू आणणारा तर कधी डोळे वटारणारा...
खुप भाव खाणारा...तर कधी भाव देणारा...
असा मित्र पाहीजे ...
तिखट वागणारा तर कधी खूप गोड बोलणारा...
कृष्णा च्या मंजुळ पाव्यासारखा...
गोड गोड खव्यासारखा...
असा मित्र पाहीजे...
*आयुष्य भर साथ देणारा... अगदी तुझ्या सारखा*.... *"कान्हा"*....
🙏🏻*राधे कृष्ण* 🙏🏻