...

2 views

आई बाप
बापाने केले माझ्या आयुष्यभर कष्ट
त्याच्या कष्टांना पाहून होता माझे प्रश्न नष्ट
संकटांना पुरून उरला बाप माझा
आयुष्यभर का दिली असेन त्याला नशिबाने सजा

बाप असतो माझा कधी कधी शांत
त्याला मिळाला नाही वेळ कधी निवांत
आयुष्याच्या वाटेवर त्याला भेटली नाही वाट सरळ
बाप माझा आहे प्रेमळ

आयुष्याच्या सुख दुःखात आईने सोडली नाही साथ बापाची
नेहमी तिच्या पदरात ओंजळ असते मायेची
आयुष्यभर काटकसर करून तिने केले मुलांना शिक्षित
नशिबाने का तिला केलं असेन सुखापासून वंचित

मुलांसाठी फिरतो बाप माझा गावभर
त्याच्या नशिबात आले कष्ट आयुष्यभर
बापाने केले माझ्या आयुष्यभर कष्ट
त्याच्या कष्टांना पाहून होता माझे प्रश्न नष्ट