...

16 views

जीवन ग्रंथ
जीवन ग्रंथ वाचताना
माझी 21 पाने उलटली,
22 वा पान चालू आहे,
कधी वाचून संपेल माहिती नाही.

काही वाचलेली पाने विसरून गेली,
काही पाने लक्ष्यात राहिली,
पण हे ग्रंथ असा आहे,
एकदा वाचला की मागे जाता येत नाही.

ग्रंथ फार सोपे असल्याने
खूप पटा पट वाचल जातंय,
जीवनाच्या एका भागाचं पान वाचून
पटकन उलटल जातंय.

जीवन किती लवकर संपून जाईल,
अस केला तर कस चालेल,
थोड अवघड केल तर वाचायला अवघड जाईल,
पण जीवनाला अर्थ मिळेल.

हे ग्रंथ वाचून कधी ही संपव,
पण अर्था सहित संपवा.
मला नाही आवडला तरी चालेल,
जगाला मात्र आवडाव!

© mj3112