...

10 views

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज...🚩🙏

छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर...
अंगावर काटा उभा राहतो मराठी बाणा असल्यावर...

किती पुण्य असेल प्रारब्धाचे ऐसा पुत्र पोटी जन्माला...
किती गावी थोरवी जिजाऊंची प्रणाम त्या मातेला...

खेळून गनिमीकावा सोडविले स्वतःस पेटाऱ्यातून...
दाविली शक्ती संगे युक्ती अफजलखानस् फाडून...

हिंदवी स्वराज्य स्थापून हक्क मिळवून देणारा...
एकच राजा जन्मला स्वराज्याचे पांग फेडणारा...

किती ही येतात जातात सण प्रत्येक वर्षाला...
ओढ लागते शिवजयंतीची महाराष्ट्राच्या मातीला...

प्रत्येक मनामनांत होता, आहे, असणार माझा शिवराजा...
ओळख अस्तित्वाची त्याच्या जग संबोधतो तयास् जाणता राजा...

🚩🙏-©शब्द पौर्णिमा...✍️