...

4 views

"आनंद निधान "
*श्रावणमास विशेष...१२*

*रोज एक ‌श्रावण कविता...*

काव्यप्रकार.. अभंग‌वृत्त

१२) *श्रावणाचा मास (अभंग वृत्त )*



(*श्रावणमास निमित्ताने रोज एक कविता*)

*आनंद निधान*

आनंद निधान
श्रावण महिना
मनात माईंना
निजरूप...!

श्रावण पाऊस
अनाहूत सर
सृजनाची जर
मनोमनी ...!

श्रावणाचा मास
नवखा वाटतो
अंगणी साठतो
स्वागतास...!

श्रावण पाऊस
धिंगाणा घालतो
आठवे माळतो
समृद्धीची...!

श्रावण महिना
जीवनी ठसतो
मनात उरतो
आशावादी. ..!

श्रावणी पाऊस
करी सुजलाम
धरा सुफलाम
संजीवन. ..!

सासर माहेर
पाऊस आगळा
श्रावण सावळा
बरसतो....!

श्रावण महिना
आप्तेष्ट बनला
मायेत विणला
स्नेहबंध. ..!

श्रावणाचा मास
दवबिंदू नक्षी
आठवांचे पक्षी
मनांगणी...!

*विजय यशवंत सातपुते, पुणे*
© All Rights Reserved