...

4 views

अनोळखी वाट...
वाट आहे अनोळखी पुढची..

पण, हिम्मत आहे, त्यावर धाव घेण्याची..

कदाचित चुकेल रस्ता थोडा पुढचा,

पण, मागोवा नको हा विचारांचा...

युद्ध असतेच चालू या मनाशी, मेंदूचे..

पण, विचार ऐकावे कुणाचे??

एका गोष्टीवर कितीतरी विचार ना...

पण, सत्य का हे टिकेना??

जर असते सत्य सगळीकडे,

तर, कदाचित धाव नसती घेतली, अतिविचाराकडे...

विश्वास नको फक्त स्वार्थाचा,

तो पुरून उरला पाहिजे, अस्तित्वाचा...

सत्य स्वप्नात नको, तर जगण्याच्या अर्थपूर्णतेत हवयं..

हो, सत्य जगण्याच्या अर्थपूर्णतेत हवयं

© yogi