...

17 views

सप्तपदी विना.......
तुझ्या पर्यंत पोहचणारी प्रत्येक पायवाट झाली...
सर्व बंधनातून मुक्त होऊन कैदी तुझीच झाली...
तुझ्या प्रेमात मी...
सप्तपदी विना ही तुझीच झाली....
सीता आहे रामाची तरी राधा बनली कृष्णाची...
अर्धांगिनी तुझीच झाली,तरी अर्धशक्ती आहे शिवाची...
तुझ्या प्रेमात मी ...
सप्तपदी विना ही तुझीच झाली....
मी कविता प्रेमाची शब्दात तुझ्याच गुंफलेली...
मी कळी गुलाबाची तुझ्याच प्रेमात फुललेली....
तुझ्या प्रेमात मी...
सप्तपदी विना ही तुझीच झाली...
ना हिरवा चुडा भरलेली ना कुंकू भांगात भरलेली...
तरी ही या मनी मंगळसूत्र फक्त तुझेच घातलेली....
तुझ्या प्रेमात मी...
सप्तपदी विना ही तुझीच झालेली....
सप्तपदी विना ही तुझीच झालेली....

😊मधू😊