...

1 views

बाजार
आयुष्याचा बाजार मांडला ईथे,
आयुष्याला खेळ समजुन.
घडीभराचा डाव माडला ईथे,
आयुष्याला रेष समजुन.

थोडा वेळेच्या वावटळीत,
ईथे ऊडतो माणुस,
वावटाळीला आधार समजुन.

नुसता देखाव्या पायी डोलारा,
उभारला ईथे,
आत्म संन्मान बाजुला ठेऊन.

नुसते पायात पाय अडकून,
ओढतात ईथे,
माणसाला खेकडा समजुन.

आयुष्याचा नुसता बोजवारा केला ईथे,
अखेरचा रद्दी माल समजुन.

आयुष्याचा पालापाचोळा केला ईथे,
आयुष्यला एकदम हलके समजुन,
आयुष्याला एकदम हलके समजुन.
=====================
सुधीर बी. पिंपळे. गाव-तांदळा (माहुरगड),
महाराष्ट्र. ह. मु. 431804.
===========







© All Rights Reserved