...

2 views

जानवी.....💖💫
लक्ष्मीसारखं रूप तुझ ,
हसन जस चमकता तारा,
बोलणं आहे गोड ,
पण माझ्याशी आहे तिखट
त्यात ही असती माया...❤️

स्पर्धेत आहे अग्रेसर,
कोणती स्पर्धा सोडत नाही ,
सतत घेते सहभाग ,
यशस्वीही होते कारण
मेहनत असते खूप .....

आपल काम आणि आपण
असा तुझा नारा ,
न कोणाच्या अध्यात न मध्यात ,
अशी तुझी वृत्ती ...

कृष्णारासारख वागणं तुझ ,
सुदामासारखी भक्त मी तुझी ,
तुझी माझी मैत्री ,
कायम टिकणारी ...

मनातली भावना नाही सांगत कुणा ,
आपल दुःख आपल असत अस म्हणणं तीच ,
मलाही तुझ्यासारख थोड बनवलं ,
यासाठी आभार तुझ ...🥰

पाठांतर काय होत नाही ,
फक्त समजून घेणं हेच करणं ,
इंग्लिश आहे बेस्ट ,कारण
ती इंग्लिश ची स्टूडन्ट ....

मनात आहे दयालुपणा ,
तीव्र तल्लख अशी बुद्धी तिची ,
वाटेला गेलं कोण ,तर गय केली
जाणार नाही असे कॅरेक्टर तीच ...

कसलही संकट असे ,
तरी करते मात ,
जुळत नाही जास्त ,
तरीही एकत्र आहोत ....

मला सतत साथ दिली ,
नको वाटनाऱ्या जीवनाला
एक चांगली वाट दिली,

शिक्षकांबद्दल खूप आदर ,
आई वडिलांची इज्जत प्यारी ,
करिअर फोकस असणारी ,
अशी माझी जानवी

प्रॅक्टिकल मध्ये असते फास्ट ,
कॅलक्युलेशन मध्ये जोड नाही ,
कायम दिला हातामध्ये हात ,
या मैत्रीचा कधी अंत नाही ....

तुझी मैत्रीण
राजनंदिनी लोमटे

s