...

1 views

थोरला भाऊ
घरासाठी भभावंडासाठी
थोरला भाऊ झिजत असतो
जबाबदारीचे ओझे वाहत
उन्हा पाऊसात भिजत असतो़


कोडकौतुक, हौसमजा
वाट्याला कधी येत नाही
आयुष्य सारे कष्टामध्ये
खसता खात संपून जाई

बाबा नसताना बाबा होतो
मायेची माऊली होतो
तुमची आमची काळजी करत
उन्हा मधील साऊली होतो

त्याचे झिजने, त्याचे राबणे
आपण थोडे जाणले पाहिजे
थोरल्या भावाचे मोठेपण
मोकळ्या मनाने मानले पाहिजे़


सावी शिंदे