...

5 views

सृष्टीमनातून - सुवर्णछटा..

या सोनकिरणात न्हाहता
उजळल्या संभ्रमी वाटा
अन सृष्टीमनात डोकावता
गवसल्या सुवर्ण छटा...धृ

नित्य धावत्या तरंगासवे
आयुष्याचे गाणे गावे
निसर्गाचिया प्रवाहासवे
या जन्माचे ध्येय घ्यावे
निजस्वार्थाच्या दुनियेमध्ये
खेळुनिया निस्वार्थ पटा
या सृष्टीमनात डोकावता
गवसल्या सुवर्ण छटा...१

राब राब राबले कितीही
मूल्य तयाचे कुणा नसे
आयुष्याच्या प्रलयांतरीही
देव हृदयामध्येच दिसे
मतलबी या जगास साऱ्या
झिजणाऱ्याचा खुपे काटा
या सृष्टीमनात डोकावता
गवसल्या सुवर्ण छटा...२

कर्तव्याची रेघ समांतर
थांग जराही नसे तिजला
लढण्याची उर्मी निरंतर
थकव्याचा न स्पर्श तिला
महाकालच्या अग्निपथावर
जळूनी जगे तो सन्नाटा
या सृष्टीमनात डोकावता
गवसल्या सुवर्ण छटा...३

© ईशान्य..