...

13 views

जीवनातील सत्य
जीवनातील सत्य
-------------------
वेळ बदलत चालली आहे.
भूतकाळ वर्तमानात येऊन
थबकलाय. हो भविष्य चेहऱ्यावरच्या
सुरकुत्या मध्ये पाहू
शकता तुम्ही.

जिद्दीचा एक खडतर
काळ बघणारे कधीच
थांबत नाहीत किंवा
भीक घालत नाही
संकटाला कधीही.

जुन्या चित्रांकडे बघत
तुम्ही सुरु करू शकता
एक कृष्ण - धवल चित्रपट
बघू शकता रंगीबेरंगी
आठवणींची काच लावून.

आलेला दिवस संपताना
बघूनही तुम्ही चिंताग्रस्त
कशाला राहता,मरण जर
येणारच आहे,हे ठरलेलं
आहेच तर जगा की
"आज"...उद्याचा भरवसा
तुम्हाला सुद्धा नाही.

आनंदी राहाण्याची
दवा देऊ का? फक्त
दोन गोष्टी करा
मुलींची भ्रूणहत्या
करू नका अन
आई - बापाला
ठेवू नका
वृद्धश्रमात!

सुरज तायडे