आज मला काही सुचतच नाही.....
नाही सुचली आज एकही कविता.....
मनात न्हवते शब्द न काही रुचता.
लिहायच्या होत्या मला....
ओळी मात्र भरपुर
पण.......
शब्दांनाच न्हवता....
आज माझ्या अर्थाचा पूर.
ढगाच्या वेलींना आज....
चिडवत होते पक्षी
माझ्या मात्र मनात न्हवती.....
शब्दांची कोणतीच स्तुती.
यमक नाही आज सापडे....
आहे सगळे शब्दांचे तूटवडे
काय करू नि कुठे जाऊ.....
मन नाही घरात राहू.
का असं आजच वाटे....
रहस्य हे ओळीचे साठे
डोळ्यात अश्रू आहे मोठे....
लेखणी मात्र वाटच पाहते.
नदी काठी जाऊन बसलो....
पाण्यात शब्द शोधत रमलो
पण.....
आज मला सुचतच नाही......
पापण्या मात्र शोधतच राही.
पक्षी मात्र किलबिल करती.....
शब्दांचा नवा धूळ उडवती
मी फक्त पहात राही.....
आज मला काही सुचतच नाही.
का असा मी गुमसत बसलो....
ओळीवर असा मी का आज रुसलो
मनात शब्द येत नाही......
लेखणी मात्र वाटच पाही
लेखणी मात्र वाटच पाही ✒️😔😔
© गुरु
मनात न्हवते शब्द न काही रुचता.
लिहायच्या होत्या मला....
ओळी मात्र भरपुर
पण.......
शब्दांनाच न्हवता....
आज माझ्या अर्थाचा पूर.
ढगाच्या वेलींना आज....
चिडवत होते पक्षी
माझ्या मात्र मनात न्हवती.....
शब्दांची कोणतीच स्तुती.
यमक नाही आज सापडे....
आहे सगळे शब्दांचे तूटवडे
काय करू नि कुठे जाऊ.....
मन नाही घरात राहू.
का असं आजच वाटे....
रहस्य हे ओळीचे साठे
डोळ्यात अश्रू आहे मोठे....
लेखणी मात्र वाटच पाहते.
नदी काठी जाऊन बसलो....
पाण्यात शब्द शोधत रमलो
पण.....
आज मला सुचतच नाही......
पापण्या मात्र शोधतच राही.
पक्षी मात्र किलबिल करती.....
शब्दांचा नवा धूळ उडवती
मी फक्त पहात राही.....
आज मला काही सुचतच नाही.
का असा मी गुमसत बसलो....
ओळीवर असा मी का आज रुसलो
मनात शब्द येत नाही......
लेखणी मात्र वाटच पाही
लेखणी मात्र वाटच पाही ✒️😔😔
© गुरु