...

5 views

वाट..होरपळलेली
ही कशी विपरीत स्थिती,
दाराशी येऊन ठेपली,
कुणास ठाऊक का,
पण त्याच वाटेवरून पुन्हा,
चालायची भीती मनात दडली,
वाट ती इतकी घनदाट,
सर्वत्र काळोख,
आणि मार्गावर भेदक कांच,
बांधली होती मी मनाशी गाठ,
प्रकाशाच्या उजेडाची
तेवत ठेवेल इथे वात,
काच ही वेचून,
करेल रस्ता मोकळा,
झाले ही ते जे ठाणीले,
पण पाय मात्र माझेच पोळले
कुरवाळत त्या जखमा,
सावरले स्वतःला,
धरिला नवा मार्ग,
पण विसरूनच गेले होते,
पृथ्वी गोल,
फिरुनी नशीब पुन्हा
परीक्षा घेण्यास
आणून ठेवेल,
त्याच वाटेवर पुन्हा.....