...

9 views

विरह
कधी कधी वाटत,
सोडून द्यावे,
हा धीर गंभीरपणाचा मुखवटा,
ह्या हिम्मतिला हारन्यास सांगून,
मुक्त पणे कोसळावे,
ढसाढसा रडून मोकळे व्हावे,
हट्ट धरावा देवाकडे,
हा विरह संपवण्यासाठी,
धरावे तुला घट्ट मिठीत,
आणि मागावी भीक परतीची,
नव्याने नात बांधण्याची
विचारव तुला
माझ्या सगळ्या का ची उत्तर,
का हा अहंकार
प्रेमापेक्षा मोठा?
का तू इतक्या सहज विसरलास
माझं प्रेम,आपले क्षण,
का मला तुझ्या आयुष्यातुन
इतक्या सहज मिटवून टाकलं
जणू मी केव्हां नव्हतेचमुळी,
जाता जाता मलाही,
तुझ्याकडे असलेली चमत्कारिक बुटी देऊन जाता,
निदान माझ्या मनातील हे वादळ शांत झाले असते