...

0 views

श्री स्वामी समर्थ भजन
🙏श्री स्वामी समर्थ भजन🙏

अक्कलकोटी ग्रामीण अवतरले स्वामी l
अवतारी दत्त पाहिले l
स्वामी समर्थ भक्तांच्या भेटीला आले l

ललित पंचमीचा दिवस तो थोर l
धन्य धन्य झाले खंडोबा मंदिर l
सुखाची उधळण केली सद्गुरुन l
शिव हर शंकर भजन बोलले l
स्वामी समर्थ भक्तांच्या भेटीला आले l

तंबाखू विस्तवाविना चिलिम फेटविली
रूप जाणून भक्तांन क्षमा मागितली
चोळपा दिसले त्यास बोलाविलेl
घरी नेले स्वामींना पूजले
स्वामी समर्थ भक्तांच्या भेटीला आले l

करू गुण गान गाऊ स्वामींच भजन l
स्वामी नामात या  तल्लीन होऊन l
धावूनिया आला  भक्तांच्या हाकेला l
नाम घेता संकट हरले l
स्वामी समर्थ भक्तांच्या भेटीला आले l

स्वामीमय तन स्वामीमय मन
पुरवावी आस दावून चरण
माता आणि पिता तुम्हीच समर्थ
आशीर्वादाने सुख लाभले
स्वामी समर्थ भक्तांच्या भेटीला आली l

वटवृक्षा ठाई  पायी विसावले l
धूपदीप देऊनी ओवाळीले l
दरबारी आले जग विसरले l
आरतीला भक्त जमले
स्वामी समर्थ भक्तांच्या भेटीला आले

     भजन लेखन-
      मनिषा मिसाळ