...

42 views

हृदयाची साद...
हाक माझी पोहचेल आसमंतात...
तिथं पर्यंत ऐकशील अन् हृदयाची साद तुझ्या घालशील ना...


नजर माझी जाईल त्या क्षितिजावर...
तिथं पर्यंत बघशील अन् हृदयाची साद तुझ्या घालशील ना...


भाव माझे दाटतील अंत:करणात...
तिथं पर्यंत जाणशील अन् हृदयाची साद तुझ्या घालशील ना...


हात माझे टेकतील आकाशाला...
तिथं पर्यंत पोहचशील अन् हृदयाची साद तुझ्या घालशील ना...


स्पर्श माझा सदैव आहे तुझ्या मनाला...
तिथं पर्यंत भिडशील अन् हृदयाची साद तुझ्या घालशील ना...


हृदयातील श्वासात तुझ्या आठवण माझी...
तिथं पर्यंत जपशील अन् हृदयाची साद तुझ्या घालशील ना...

{Poonam}🖊️