...

4 views

हे मना
हे मना मीच तुझा खरा अपराधी
तुला सुटायचं होतं मोकाट ,सैरभैर ,सुसाट...
पण मी होतो संस्कारांच्या कुंपणात .
तुला घ्यायची होती भरारी उंच आकाशात
पण मी तुला अडवलं ...
तुला पळयाचं होतं रुळलेल्या वाटा सोडून
पण मी तुला वळवलं ...
मी आहे तुझ्या गळ्यातलं लोडणं
मला वागवतच तू फिरलास
मी तरी काय करू . . मला ही होतं लोडणं . . .मेंदूच !
आता बस्स . . . मी तुला मुक्त सोडतो
तुच मला घेऊन चल
अगदी कुठंही . . . !

© शिव पंडित