...

7 views

चित्रकाव्य ❤❤❤
सांडलेले अंतराळात
वेचूनी दिव्य तेजःकण ,
मोहरू नको सुधांशू
होउनी रे तू दारुण ।
कधी कां रे तुझा मी
करावा असा हुरूप ,
जरी माहिती की नव्हे
खरे हे तुझे स्व रूप ।
पाण्यावर तरंगले
अपुले हे प्रतिबिंब ,
तुच सांग मज आता
ओलांडू कशी रे खिंड ।
तुला म्हणून सांगते
गुंग प्रेमात प्रियाच्या ,
मोहवितो मज जणू
तुच रूपात रे त्याच्या ।
येणार मज भेटण्या
आज तो चंदेरी राती ,
चांदण्याही मनातल्या
त्याचेच गीत रे गाती ।
मी लावण्य रूपवती
माळूनी शुभ्र गजरा ,
भेटण्यास रे प्रियाला
आली चोरूनी नजरा ।
नाही रे भान मजला
बेभान चालली वाटा ,
सुनसान तमामध्ये
करी पैंजन बोभाटा ।
आली घरूनी एकटी
घेउनी घागर रिती ,
अशा एकांत समयी
तुच रे सखा सोबती ।
लपूनी बस तू आता
आली घडी मीलनाची ,
लाजूनी लाल मी झाली
नितळ गो-या तनाची ।

✒️कवी,
विजय दागमवार
© 💫अक्षरांच्या ओळी