...

5 views

श्री राम
रघु वंशाचे कुलदीपक ,
क्षत्रिय ज्यांची जात ,
सीतेचे तुम्ही रघुराया ,
सत्य वचनी,परम दयाळू ,
श्री राम ..

अयोध्येचे प्रिय राजकुमार
लक्ष्मण , भरत,शत्रुघ्न चे भाऊराया ,
परिपूर्ण पुत्र आणि आदर्श पती ,
असणारे श्री राम ....

विष्णूचे तुम्ही अवतार
मर्यादा पुरुषोत्तम या विशेषण
जाणणारे
एकवचनी एकबानी आणि,एकपत्नी
अस कर्तृत्ववान ...
प्रभू श्री राम

आई ची आज्ञा ,वडिलांचे वचन
पूर्ण करण्याकरिता , विना दोष वनवास पूर्ण केला ..
वैयक्तिक सुखाचा विचार न करता
राजधर्म म्हणून पत्नीचा त्याग केला
असे शुरपुरूष ,श्री राम


राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेले ,दुसऱ्यांना आनंदात रममाण करणारे ,
पवित्र हरी नाम घेता दूर होईल दुष्कर्म
सत्याचे वारी म्हणजे प्रभू श्री राम

राजनंदिनी लोमटे
ssmb..

© All Rights Reserved