...

1 views

मनातली कथा ... (एका मुलीची )🥺✨
जेव्हा जन्माला आले ,
सर्वजण नाराज झाले ,
जन्म होताच आजोबा गेले ,
अपशकुनी पोर अस म्हटल गेले ,

बाबा होते व्यसनी ,
सतत करत होते तिरस्कार ,
आईने दिली साथ ,
सांगू कसे तिचे उपकार ...

लहानाची झाली मोठी ,
दुसऱ्याच्या घरी ,
काय घालायचं ,यापासून कस वागायचं
इथपासून दूसऱ्यांचेच निर्णय

सतत सर्वंचा मन जपणं ,
आदर करणं , गोड बोलणं.
का तर पोरगी आहे
असच वागावं लागत ...

मन होत निरागस तीच .
सतत करते माया सगळयाची,
तरीही नाती टिकत नाहित ....

सर्व ठिकाणी केला जातो
हेवा देवां...
पैशामुळ अडत होत शिक्षण ,
तरीही केलं पूर्ण तीन...

जीवनातली कथा , अन् मनातली व्यथा ..
सांगवी कुणा ...
मैत्रिन पण नाही भेटली खास ..
नातेवाईक तर म्हणतात लांबूनच बास ...

वाटत कधी घ्यावा फास ,
परत दिसतात आई बाप ,
समाजाची वाइट बात ,
जगणं झालं जड तरी ,
घ्यावा लागतो श्वास ...

देवाचं नाम आहे मुखात ,
नकोष्या वाटणाऱ्या आयुष्यात ,
लढत आहे खास ,
आता तरी दुःख संपेल ,
अशी धरून आस ...

राजनंदिनी लोमटे