...

8 views

प्रेम.....????
प्रेम म्हणजे नक्की काय?
कधी मला हे समजलंच नाही,
कारण प्रेमात कोणाच्या पडणं
मला कधी जमलंच नाही

प्रेम नक्की असत कस?
ते नक्की भासत कस?
ते जाणवत, की जाणाव लागतं?
ते होत, की कराव लागतं?

अर्थ ह्या प्रेमाचा,
मला कधी कळलाच नाही,
कारण भावना तुझ्या डोळ्यातल्या,
मला वाचता आल्याचं नाही.

मला वाटत,
प्रेम म्हणजे नसते मिळवणे
ते तर असते नुसते देणे
घेण्यापेक्षा देण्यातच
मिळतो आनंद साता जन्मीचा

प्रेम म्हणजे असतो सौदा
केवळ दोन हृदयांचा
केला जातो अबोल ओठांनी ...