लाडोबा...!
लाडोबा...!
घरात माणसं,
ईनमीन चार
वागण्याच्या त्यांच्या,
तर्हाच फ़ार ||1||
ताई करी सारखा,
नट्टाथट्टा
आईचा चालतो
तोंडाचा पट्टा ||2||
काम म्हंटल,
दादा पसार
बाबांच्या हाक्कांनी,
घर बेजार ||3||
मीच तेवढी,
शहाणी मला
मोजत नाही,
कुणी त्यांच्यात मला ||4||
असं म्हंटल कि,
चिडतात सारे
लाडोबाचे म्हणे,
लाड आता पुरे ||5||
गंमत केली मी,
म्हणताच खर
खळखळून हसत
घर मगं सारं ||6||
© Vrushu
घरात माणसं,
ईनमीन चार
वागण्याच्या त्यांच्या,
तर्हाच फ़ार ||1||
ताई करी सारखा,
नट्टाथट्टा
आईचा चालतो
तोंडाचा पट्टा ||2||
काम म्हंटल,
दादा पसार
बाबांच्या हाक्कांनी,
घर बेजार ||3||
मीच तेवढी,
शहाणी मला
मोजत नाही,
कुणी त्यांच्यात मला ||4||
असं म्हंटल कि,
चिडतात सारे
लाडोबाचे म्हणे,
लाड आता पुरे ||5||
गंमत केली मी,
म्हणताच खर
खळखळून हसत
घर मगं सारं ||6||
© Vrushu