...

6 views

शाळेतील ती परी
आजही मला सर्वांच्या नकळत,
तुला चोरून पहायला आवडतं
आजही तुझ्याशी बोलण्यासाठी,
मला कारणं शोधायला आवडतं

आजही तुझ्याशी तास न् तास,
बोलत बसायला मला आवडतं
अन् आजही तु बोलु लागलीस की,
मला ऐकत बसायला आवडतं

आजही कॉलेज व अभ्यासात,
तुला विसरून जायला आवडतं
नंतर मात्र एकांत अन् शांततेत ,
तुला पुन्हा पुन्हा आठवायला आवडतं

आजही मला स्वप्नात तुला,
एकटीला च पहायला आवडतं
अन् स्वप्नातही अशक्य काम ,
तुझ्यासाठी शक्य करायला आवडतं

आजही मला तुझ्या पुढील भेटीची ,
आतुरतेने वाट पहायला आवडतं
अन् एवढे नकार स्वीकारूनही मला,
पुन्हा तुझ्या प्रेमात पडायला आवडतं......

पुन्हा तुझ्या प्रेमात पडायला आवडतं.....