...

24 views

कविता
का भासावी चणचण शब्दांना
​की ते ही माझ्याशी ​खेळतात डाव...
​कागदावर उमटतांंना ​लेखणी अडखळते
​नि अधुरे ​लिखाण खाऊन जाते भाव..
​कदाचित...
​पुस्तकं डोळ्यात प्राण आणून
​उघडण्यासाठी आसुसलेली...
​आणि वही पण ती बिचारी
​जुनीच पानं बघायची चाळलेली...
​जुनाट लिखाणाला आता
​कपाटात सुद्धा जागा नाही...
​इतके कसे झाले ते शब्द कडवट
जे ​बुरशीलाही गिळवत नाही...
​वाटे मनाला नवीन वाचून
​लिहावं नवं काही...
​तर वाटून जाईल मनाला
​शब्दं चोरलेले तर नाही...
​हिच भिती मनात
​कित्येक प्रश्न कोरतेय...
​शोधते मी त्या शब्दांना ज्याच्या
​शब्दात अस्तित्व माझे जपतेय...
​मिळतील का कुठेतरी
​शब्दं अशी दोन-तीन...
​जे वाटणार नाहीत चोरलेले
​असतील ते अगदी नवीन...
​भेटतील का कधी मनाला
​असे शब्दं जे फिरतील दिशा दाही...
​नाहीतर कारणं द्यावी लागतील परत
​जे पुस्तकांना चालणार नाही...

​ शोभा मानवटकर....




© All Rights Reserved