...

6 views

🦋❣️सौंदर्य ❣️🦋
सुंदर चेहरा असणे म्हणजे सौंदर्य नाही तर एक सुंदर मन, एक सुंदर हृदय आणि मुख्य म्हणजे एक सुंदर आत्मा असणे म्हणजे सौंदर्य
सुंदर’ या शब्दाने खरंच एखाद्या गुणधर्माचा निर्देश होतो का? होत असला तर त्याचे निकष काय? त्याची व्याख्या काय? कोणत्या गोष्टीना सुंदर म्हणावं? कोणत्या निकषांमुळे त्या सुंदर ठरतात?

या सर्व प्रश्नांची निश्चित उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. म्हणजे सौंदर्य ही व्यक्तिसापेक्ष संज्ञा आहे हे उघड आहे.
तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. मग तो काळा असो गोरा असो उंच असो ठेगणा असो.
प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या परीने सुंदर आहे. सुंदरता म्हणजे फक्त चेहराच नव्हे ना... व्यक्तीच्या वागण्यात, बोलण्यात , समजावून घेण्यात ,समजण्यात नम्रता असली की प्रत्येक व्यक्ती सुंदर...हो ना... बघा पटतंय का तर.....😊🙏🏻
#सांज._सखी
© Ig|saanz._sakhi