...

9 views

विपरीत.....
विपरीत.......
खूप सारं विपरीत घडलंय
जगण्याचं रहस्य त्यातच दडलंय
रानवाटा कठोर गावल्या
जणांना मात्र उपहास वाटल्या
क्षणभंगुर सुखाचं पत्रच फाडलंय
संघर्षाचं खापर कधी कुणा कळलंय
खूप सारं विपरीत घडलंय..........

आनंदाचे झाड नभात शिरले
जेव्हा फाटलेले चिटोरे नव्याने जुळाले
असा हा खेळ गमतीचा ठरला
जो जगला खरे त्यालाच कळला
सरीतेचं गीत सागरां कधी कळलंय
खूप सारं विपरीत घडलंय........

हृदयाची धडधड कायम होत गेली
जेव्हा न्यायालयाची पायरी शहाण्याने चढली
न केलेल्या कृतीचे अपराधी ठरले
स्वतःच्याच जीवनाशी कायमचेच हरले
स्वभिमानाचं जगणं कधी अभिमाना कळलंय
खूप सारं विपरीत घडलंय......
खूप सारं विपरीत घडलंय.....

........शालिनी. दि. सोमकुंवर....