...

6 views

तेव्हा आपण भेटु...
या निळ्याशार आकाशात काळभोर ढग दाटून येतील
तेव्हा आपण भेटु...

पावसाचा प्रत्येक थेंब मातीत मिसळून लुप्त होईल
तेव्हा आपण भेटु...

भकास रस्त्यावर मी तुझ्या विचारात चालत असेल
तेव्हा आपण भेटु...

तुझ्यासाठी कविता करतांना मी शब्दांना वेचत असेल
तेव्हा आपण भेटु...

तुझ्या आठवांचा विचार करून स्वप्न रंगवताना डोळे अलगद मिटतील
तेव्हा आपण भेटु...