...

3 views

विचार झाले मनाला अनावर....
विचारांचं काहूर माजलं हो मनाच्या घरात,
कितीही प्रयत्न केले कंठ दाटून ही त्यांचे रूपांतर झाले नाही स्वरात...

ओसाड पडून राहिलेलं मन ही आज विचारांनी गजबजलेलं,
पहा न अनावर झालेल्या भावनांना कसं त्या हृदयाने सावरलेलं...

कधी कधी मेंदू म्हणे होईल सर्व चांग,
नुस्तं एकदा तरी तुझ्या हृदयाला सर्वकाही सांग...

विचारांचा मेळा आता मनाला होईना सहन,
त्यात शरीरात ही होऊ लागले वेदनेचे वहन...

शब्द शोधता शोधता सापडेना,
कुठले विचार कोठे येऊन पोहोचतात काही कळेना...

भावनांचा कल्लोळ माजला जणू अमित विचारांसंगे,
आधी कधी होत नव्हतं असं म्हणून हृदय माझे दंगे...

मनाला झाले हो विचार अनावर
शरीर म्हणे थांब आता कसंबसं स्वतः ला सावर
तुझ्या विचारांनी उध्वस्त केले माझे चाटक,
चेहऱ्याकडून होत नाही आता हसण्याचे नाटक..
ऐक ना रे मना,
डोळे मिटून घेतले जरी नाही अडवता येत अश्रूंना..

निर्णय घेता घेता मेंदू माझा खचला,
डोळ्यांत पाणी न‌ येऊ देता दिवसरात्र तो‌ रडला
हृदयाचे तर विचारू नकोस
थांबता थांबता थांबले त्याचे ठोके,
नाही चालवू शकत तो आता तुझ्या भावनांचे चाके...

कपाळावर चांगल्या आठ्या पसरल्या..
केसाच्या सावलीत त्यांना मी लपवल्या...
श्र्वास फुफ्फुसात जाऊन जणू अडकत होते
म्हणून शेवटी हात ही माझे वेदनेने थरथरत होते...

आसवांच्या आंधळ्या डोळ्यांनी स्वतः मध्ये प्राण होते चाचपत,
तेवढ्यातंच पाय लागले लटलट करत,
कळत नाही करावं तरी काय,
दिसत नाही रे मना कसलाच उपाय...

©वंशिका चौबे
© All Rights Reserved