...

1 views

तुझ्यात नि माझ्यात काय असावे
तुझ्या डोळ्यात मी दिसावे ही अपेक्षाच नाही
पण तुझ्या भोवती मी आहे ही तुला जाणीव असावी
माझी साथ हवी असेल तर तु प्रेमासोबत विश्वासाची साथ दे
माझ्या वाटेवर तु चालावे हे मला का वाटेल
माझे मत तुला पटले तर ते मला पटणार नाही
माझ्या मतांचा विचार कर पण तुझे मत दडवू नकोस
आपले विचार समजून घेऊयात समजवायला नकोत
कशाला प्रेमात वेड होऊन जगायच
त्यापेक्षा जगाचं भान ठेवून प्रेमाच्या आठवणी कोरूयात
म्हणजे आपल्या वरच प्रेम कमी होतंय ही जाणीव नाही तिळ तिळ मारणार
आणि सुखद आठवणी ही नाही बोचणार
मी जाणीव ठेवीन आपल्या नात्यांमधील
पण प्रत्येक वेळी भरून नाही काढू शकत आपल्यातली उनीव