...

4 views

पांघरून
पांघरून नेहमीच घालत आली ती व्यक्तिरेखा म्हणजे आई
मग शिशु वयात असो ,रात्री जागून, या किशोर वयात असो , चुकांवर ...

तीच अस्तित्वच तिने विसरलेलं असत आणि बेभानपणे ती....
आपल्या संसारात स्वतःला मात्र वाहवत नेते अगदी संततधार पणे...,

काळीज तीच असतंच कोमल , नाजूक आपल्या पिल्लांसाठीच...
पण तीच नाजूका वेळे प्रसंगी होते अष्ट दुर्गा ,काली, फक्त पिल्लांसाठीच

आई शब्दांचा अर्थ लिहायचा झाला न, तर आई अनुभवावी लागते
तर आई होऊन कष्टाची धनिक होऊन तडजोड ही जगावी लागते....

नऊ महिने न पाहता ही प्रेम करणारी ती, ह्या जगातील एकमेव शक्ती
जीवाचा आकांत करून जन्म देणारी नि जन्म सार्थकी लावणारी एकमेव उक्ती...

जणू ती माऊली खरोखर जीव सृष्टीचं अलौकिक आणि...
ईश्वरीय अधिकार प्राप्त असलेलं सुंदर वास्तविक निर्माण रूप होय न?

लहानाचे मोठे करते जेव्हा ती आपल्या पिल्लाना...., तेव्हा तेव्हा तिने-
स्वतः मात्र स्व झीज करून वेळ पेरत गेली, नि संसार वटवृक्ष वाढवला तिने

न देह राखला , न आवड जोपासली, उपाशी ही राहते कित्येक वेळी ती-
भविष्याचा दाखला हाती घेऊन यशोकीर्ति ची मशाल प्रज्वलित करते ती

संसार संसार माझाच संसार म्हणत राब राबते ती फक्त माऊली ही
आणि शेवटी संसाराला नाव देखील स्वतःचे नाही लावते,तीच जननीच न ही?