...

19 views

कविता...💐
वाळूवर चालतांना
​त्या समुद्र किनाऱ्याशी
​बोलावंसं वाटते नेहमी
​आपल्याच मनाशी
​आश्चर्य वाटते ते उमटलेल्या
​आपल्याच पायांच्या
​पाऊलखुणांचे...
​वाळूवर ठळक ​रूतलेले
​पाऊलखुणांचे ठसे तरी
​अलगद ती लाट येता
​ठसे ते उचलून नेते कसे?
​मनात परत काहूर
​त्याच विचारांचे
​वाळूही अनोळखीच
​लाटेसाठी ​आणि...
​ठसेही होते अनोळखीच
​तरीही त्या लाटेने
​क्षणातच त्यांना
​आपलेसे केले कसे?
​त्याहूनही वरचढ मग
​काही ठसे धावही घेतात
​पाण्याच्या त्या प्रवाहाविरुद्ध
​पण काही ठसे
​बिचारे अधीन च होतात
​त्या पाण्याखाली रहायला
​नाईलाजच होतो त्यांचाही...

​ शोभा मानवटकर...




© All Rights Reserved