...

6 views

कानातला हेडफोन
कानातला हेडफोन.. मनातली अशांतता संपवत नाही,
मनातलं सारं.. ओठांवर बऱ्याचदा येत नाही...

आर्तता असते काही गाण्यात,
पण तीही मनाला समाधान देत नाहीत...

सारं काही असतं आनंदीपणे जगण्यास,
पण तेही समाधान देत नाही...

काळाच्या ओघात हरवतं बरंच काही..
असलेल्या नात्याचं माणसाला मोलंच कळत नाही...

कानातला हेडफोन.. शांत करेल तेव्हा मन,
आपल्यांशी मनमोकळेपणानं.. बोलेल प्रत्येक जण...

© Prasad Thale